रोपट्याचं करिअर काऊन्सलिंग ! (in Marathi)

PostedonDec. 20, 2018in Perspectives

एक लहानसं रोपटं आलं करिअर
काऊन्सलिंगसाठी…कोवळी पानं… तुकतुकीत… चकचकीत …चमकणारी …ताजी टवटवीत हिरवीगार…

मी कोण होऊ मोठं झाल्यावर ? 

कोणत्या रंगाची फुलं यावीत मला?
आणि कोणती फळं? सगळयांना आवडतील अशी असतील माझी ?…
टाॅनिक असतं का लवकर मोठ्ठं होता येईल असं?

मी त्याला जवळ घेतलं आणि म्हटलं …

तुला काहीच करायचं नाहीये तू फक्त श्वास घे, मोकळया हवेत…उन्हाची किरणं तुला मोठं करतील…

बनू नकोस तू फक्त ‘हो’ …

एखाद्या निसर्गाच्या रहस्यासारखा उलगड आणि आश्चर्यचकित कर आसमंताला…

तुझी मुळं मनसोक्त जाऊ दे खोल पाण्याच्या शोधात आणि भेदू दे खडक …
ते खडकच करतील तुला मजबूत आणि देतील आकाशाला स्पर्श करण्याची स्वप्नं…

ईतरांकडे बघू नकोस …कारण जे अपूर्ण असतात त्यांना बाहेरून घ्यावं लागतं काहीतरी पूर्ण होण्यासाठी
तू तर पूर्णच आहेस तुला फक्त व्यक्त व्हायचंय.

करिअर काऊन्सलिंग मला त्यांचं करायचंय, ज्यांना तुझं हे फुलणं संयमानं पहाणं … आणि थोडसं धीरानं थांबणं जमत नाहीये !

(अज्ञात कवी)
Rough translation
Career Counselling for a sapling
A little sapling came for career counselling
Tender leaves… bright and shiny
Fresh and lively
What should I become when I grow up?
What colour should my flowers be?
And what fruits? so everyone likes them…?
Have you a tonic that will enable me to grow up soon?
With my arm around him, I said…
You don’t have to do anything, just breathe the air,
Rays of sunlight will ensure your growth
Don’t become, just ‘be’…
Unfold like a mystery of nature and surprise all around…
Let your roots go deep in search of water and break throug the rock
Those rocks will make you strong and let you dream of reaching the sky…
Do not look at others … for they who are not whole need to seek
from their surroundings that which will make them whole.
You, being whole, need only to express yourself.
I will offer career counselling to those who are unable to summon the patience and the restraint
to watch you grow
(Unknown Poet)
Story Tags: , , , ,

Leave a Reply

Loading...